NHM Dhule Bharti 2024 | 10 रिक्त जागा | राष्ट्रीय आरोग्य अभियान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Dhule Bharti 2024 Details

नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal महानौकरी पोर्टल मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही महाराष्ट्र शासन्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे  विभागात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 10 नव्या जागा भरणार आहेत.

NHM Dhule Bharti 2024 – NHM धुळे (National Health Mission Dhule) राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे कडून “स्टाफ नर्स आणि MPW” च्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. महिला आणि पुरुषांसाठी दोन्ही उमेदवारांसाठी वेगेवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत. ‘स्टाफनर्स’ या जागेसाठी महिला तसेच पुरुषांना दोघांना ठराविक जागा आहेत, तसेच MPW या पदासाठी फक्त पुरुषानाच जागा आहेत. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिल्या प्रमाणे आहे ती वाचून घ्यावी हि विनंती. या भरातीमध्ये एकूण 10 जागा उपलब्ध आहेत व या जागा पुरुष व महिला उमेदवार यांना एकत्र घेऊन आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण ‘धुळे’ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज दिलेल्या नमूद पत्त्यावर पाठवू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भारती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या www.mahanaukriportal.com वेबसाइटला भेट द्या. या भरती करता अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती व नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर न चुकता पाठवणे गरजेचे आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२४ ही आहे. त्यामुळे या तारखेच्या अगोदर लवकरात लवकर अर्ज भरून घेणे. अधिक माहिती करता खाली दिलेली पीडीएफ मधील जाहिरात वाचावी ही विनंती. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच या भरती संदर्भात जी काही नवीन माहिती किंवा सूचना येणार आहे ती पाहण्यासाठी, तसेच तुम्हाला नवीन जॉब अलर्ट मिळण्यासाठी आमच्या www.mahanaukriportal.com या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देत जा धन्यवाद.

NHM Dhule Bharti 2024 Notification

 • पदाचे नाव – स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), MPW (पुरुष)
 • पदसंख्या – 10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – धुळे
 • वयोमर्यादा –
 • खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्ष
 • मागासवर्ग – ४३ वर्ष

Important Dates For NHM Dhule Bharti 2024

 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट- https://dhule.gov.in/

NHM Dhule Bharti 2024 Important Documents

 1. क्षैक्षणीक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
 2. जातीचे प्रमाणपत्र
 3. शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला
 4. पासपोर्ट आकाराचे २ फोटो
 5. शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
 6. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
 7. पोलिस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला इ. आवश्यक आहे.
 8. राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे

NHM Dhule Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
स्टाफ नर्स (महिला) 04
स्टाफ नर्स (पुरुष) 01
MPW (पुरुष) 05
Educational Qualification For NHM Dhule Recruitment 2024
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (महिला) GNM/ Bsc Nursing
स्टाफ नर्स (पुरुष) GNM/ Bsc Nursing
MPW (पुरुष) 12th In Science + Paramedical Basic Training Course Or Sanitary Inspector Course
NHM Dhule Recruitment 2024 Salary Details
 • स्टाफ नर्स (महिला) रु.२०,०००/
 • स्टाफ नर्स (पुरुष) रु.२०,०००/
 • MPW (पुरुष) रु. १८,०००/-
Important Links For NHM Dhule Bharti 2024
📑 PDF जाहिरात View
अधिकृत वेबसाईट https://dhule.gov.in/
NHM Dhule Recruitment 2024 terms and Conditions
 • उपरोक्त पदे हि कंत्राटी अंत्यत तात्पुरत्या स्वरुपाची असुन नियुक्ती माहे ३० जुन २०२४ अखेर राहील. व शासनाने सदर पदे नामंजुर केल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल.
 • जाहीरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
 • अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
 • उपरोक्त कंत्राटी पदांकरीता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
 • सेवानिवृत्त विशेषतज्ञ / कर्मचारी यांचे निवड झालेस सदर पदांकरीता मानधन राज्य स्तरावरुन प्राप्त विहीत मार्गदर्शक सुचनांनुसार मोजमाप करुन अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
 • जाहीरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो तसेच रिक्त ठिकाणमध्ये बदल होऊ शकतो. याबाबतचे सर्व अधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., धुळे यांनी राखुन ठेवले आहेत.
 • अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल.
 • एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
 • एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करताना अर्जासोबत, पदांचा प्राधान्यक्रम मुलाखतीचे पुर्वी कार्यालयास सादर करावा.

Leave a Comment