महत्वाची सूचना – मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३ साठी माहिती अंतिम करण्याची मुदतवाढ.
राज्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनांना कळविण्यात येते की, “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” (२०२५-२६) अभियानात दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ च्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार शाळांना माहिती भरून अंतिम (Finalize) करण्यासाठी १९ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
तथापि, अद्यापही अनेक शाळांची माहिती अंतिम झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळांना माहिती अंतिम करण्यासाठी २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
📢 शाळांनी लक्षात ठेवावे:
माहिती भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, दिलेल्या मुदतीत तातडीने माहिती अंतिम (Finalize) करावी. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, आणि अपूर्ण माहितीमुळे शाळेचे मूल्यांकन आणि पारितोषिकांवर परिणाम होऊ शकतो.
नोंदणी व माहिती भरण्यासाठी अधिकृत पोर्टल:
👉 https://education.maharashtra.gov.in/schoolMMSSS/users/login/4 (शाळेच्या UDISE लॉगिनने प्रवेश करा)
उपयुक्त लिंक्स:
| मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा टप्पा | Official Notification |
| अभियान मार्गदर्शिका व शासन निर्णय | View PDF |
| 42 फोटो यादी | View PDF |
| कोरा – मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा टप्पा | View PDF |
हा अभियान शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे – पायाभूत सुविधा, स्वच्छता, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर आधारित. यात सहभाग घेऊन तुमची शाळा तालुका ते राज्यस्तरावर पारितोषिके रोख रक्कम जिंकू शकते!
🏫 शाळा मुख्याध्यापकांनी त्वरित कारवाई करावी.
कोणतीही शंका असल्यास कमेंट करा. महाराष्ट्र नौकरी पोर्टल – शिक्षण अपडेट्ससाठी फॉलो करा! https://mahanaukriportal.com
शिक्षण अपडेट्ससाठी फॉलो करा!
शाब्बास अकॅडमी Whatsapp Group
Hi Iam a student.
I am learn to mukhymantri Majisa shala