What is Pan card 2.0 | पॅन कार्ड २.० काय आहे हे जाणून घेवूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत करतो. या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नवीन येणारे Pan Card 2.0 याची माहिती देणार आहे. पॅन कार्ड नवीन येणार आहे अशी भरपूर ठिकाणी चर्चा चालू आहे. ही चर्चा हॉट असतानाच तुम्ही तुमच्या जुन्या पॅन कार्डच नक्की काय करायचं आणि पुढे नक्की काय होणार आहे. तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या  Blog मध्ये घेणार आहे.

सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात पॅनकार्ड 2.0 काय आहे?

पॅन कार्ड २.० म्हणजेच आता तुम्हाला जर नवीन पॅन कार्ड काढायचं असेल किंवा पॅन कार्ड मध्ये काही अपडेट करायचं असेल, दुरुस्ती करायचे असेल, तर एकदम पेपरलेस म्हणजे कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला जास्त लागणार नाहीत एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड लवकरात लवकर मिळवू शकता अशी नविन व्यवस्था. 

त्यासाठी नवीन पोर्टल लॉन्च होणार आहे आणि तुमची जी काही प्रोसेस आहे एकदम सोप्या पद्धतीने पेपरलेस होणार आहे. यासाठी हे पॅन कार्ड २.० आहे. हे नवीन पॅन कार्ड जर तुम्ही काढले तर त्यावरती एक डायनामिक क्यूआर कोड येणार आहे आणि त्यावर कोड जर कोणी स्कॅन केले तर त्यामध्ये तुमचे  नाव, जन्मतारीख, पत्ता वगैरे अशा प्रकारची काही जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती तीस डायनॅमिक किंवा कोड मध्ये दिसणार आहे आणि हेच Pancard 2.0 असणार आहे. केंद्रशासनाने याला मंजूरी दिलेली आहे.

केंद्रशासनाच्या निर्णयानुसार काही दिवसातच एक स्वतंत्र नवीन पोर्टल लॉंच होणार आहे आणि पॅनकार्ड ची सर्व काही कामे एकाच पोर्टल वरती एकदम फास्ट पद्धतीने तिथे होणार आहेत. 

There are 4 important features of this Pancard 2.0

  1. तिथे कोणतेही कागदपत्र लागणार नाहीत पेपरलेस प्रोसेस होणार आहे.
  2. यामध्ये तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही हे तुम्हाला मोफत मिळणार आहे. 
  3. पॅनकार्ड च्या सर्व सुविधा तुम्हाला मिळणार आहेत. 
  4. या मध्ये 1 tollfree नंबर असणार आहे काही प्रॉब्लेम आला तर लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील.

आता तुम्हाला काही  प्रश्न पडले असतील की आमचा अगोदर पॅन कार्ड आहे त्याचा ‘पॅनकार्ड नंबर’ बदलेल का? आणि तसेच आम्हाला नवीन पॅन कार्ड काढावा लागेल का? तर तुमचा पॅन कार्ड नंबर तोच राहणार आहे आणि  तुम्हाला नवीन सुद्धा पॅन कार्ड काढायची गरज लागणार नाही असं सरकारने सांगितलेले आहे.

त्यानंतर पुढचा प्रश्न की पॅन कार्ड मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ती होईल का?

तर नक्कीच होईल पॅन कार्ड मध्ये तुमचं नाव बदलायचं असेल, तुमची जन्मतारीख किंवा पत्ता, फोटो बदलायचं असेल यासारखी  सगळी कामे तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम पण आत्ता ते चार्जेबल आहे म्हणजे तुम्हाला पैसे भरून त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल.व तुम्हाला 107 रुपये यासाठी द्यावे लागतील. मात्र नवीन पोर्टल येईल त्यावेळेस तुम्हाला एकही रुपया ‘पॅन कार्ड’ दुरुस्तीसाठी लागणार नाही ही सुविधा तुम्हाला मोफत असणार आहे.

तुम्हाला प्रश्न पडला ऐल की  तुम्हाला तुमचे जुणे पॅन कार्ड बदलावं लागणार आहे का? जर तुमच्या पॅन कार्ड मध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नसेल तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड बदलावे लागणार नाही, तेच पॅन कार्ड तुम्ही वापरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही. 

Importance of Dynamic QR-CODE on Pan card 2.0

QR-CODE हा भाग काय नवीन नाहीये.  QR-CODE हा 2017-18 पासून येत आहे आणि त्यामुळे ते पॅन कार्ड चालणार आहे,  काही काळजी करायची गरज नाही. आणि ज्यांच्या पॅन कार्ड वरती QR-CODE नसेल हे सुद्धा पॅन कार्ड चालणार आहे. फक्त तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल किंवा काही अपडेट करायचं असेल तर तुम्ही ते अपडेट करू शकता आणि जेव्हा तुम्हाला नवीन पॅन कार्ड दुरुस्त होऊन येईल त्या पॅन कार्ड वरती मात्र डायनॅमिक QR-CODE तुम्हाला पाहायला मिळेल. त्या डायनॅमिक QR-CODE मध्ये नवीन प्रोसेस आहे ज्यामध्ये चांगल्या पद्धतीने तो क्यूआर कोड बनवला जाईल आणि तो स्कॅन केल्यानंतर एकदम करेक्ट माहिती भेटणार आहे, त्यासाठी हा डायनॅमिक क्यूआर कोड वापरला जाणार आहे. 




जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड आहेत तर तुम्हाला एक पॅन कार्ड बंद करावे लागेल नाहीतर तुम्हाला सरकारी नियमानुसार रुपये 10000 एवढा दंड बसू शकतो. जर तुमच्याकडे दोन वेगवेगळ्या नंबरचे पॅन कार्ड असतील तर मात्र लक्षात ठेवा एक पॅन कार्ड तुम्ही सरेंडर करू शकता. तुमच्या जवळच्या NSDL च्या ऑफिस ला भेट ध्या आणि  तिथे जाऊन तुम्हाला जे  पॅन कार्ड सरेंडर करायचे आहे ते करू शकता.  

 यामध्ये जर तुम्हाला काय समजले  नसेल तर या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता.धन्यवाद.

Source Of InformationCBDT’s PAN 2.0 Project india


1 thought on “What is Pan card 2.0 | पॅन कार्ड २.० काय आहे हे जाणून घेवूया.”

Leave a Comment