Maharashtra PWD Bharti 2024 | 1378 Vacancy

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra PWD Bharti 2024 Details

Maharashtra PWD Bharti 2024 – सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे प्रसिद्ध परिपत्रका नुसार लवकरच १३७८ पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या नवीन पत्रामध्ये नमूद केल्यानुसार, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील एकूण 1378 पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. Maharashtra PWD Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. Normalization साठीचे सूत्र संकेतस्थळावर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

Maharashtra PWD Bharti 2024 Notification

 • पद संख्या – 1378 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Diploma, Degree, M.tech, Others
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • परीक्षा शुल्क – खुला – १०००/- रु
 • परीक्षा शुल्क – राखीव – ९००/- रु
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 ऑक्टोबर 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2024
 • अधिकृत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in

Maharashtra PWD Bharti 2024 Exam Details

 1. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्विकारण्यात येतील.
 2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahapwd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 3. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
 4. अर्ज भरण्याची व परीक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच
 5. अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

Maharashtra PWD Bharti 2024 Required Documents

 1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
 2. वयाचा पुरावा.
 3. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा.
 4. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
 5. आर्थिक दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा.
 6. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.
 7. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा.
 8. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
 9. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
 10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
 11. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
 12. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
 13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
 14. एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा.
 15. अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ. व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
 16. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
 17. अनुभव प्रमाणपत्र.

Maharashtra PWD Bharti 2024 terms and Condition

 1. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा त्यांना लेखी सूचना दिली जाणार नाही.
 2. उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारीच्या संबंधात कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा दबाव आणण्याचा किंवा गैरप्रकारचा अवलंब केल्यास त्याची उमेदवारी अपात्र ठरवली जाईल.
 3. भरतीप्रक्रिया / परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अशंतः बदल करणे तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेणे, पडताळणीअंती अर्ज रद्द ठरविणे, निवड प्रक्रियेत वेळेवर बदल करणे, उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादीस मान्यता देणे, जाहिरातीच्या अनुषंगाने योग्यती कार्यवाही करणे याबाबतचे संपूर्ण अधिकार शासन सा.बां. विभाग मंत्रालय मुंबई / राज्यस्तरीय समन्वय समिती यांना राहतील.
 4. उमेदवारांना परीक्षेकरीता, कागदपत्रे पडताळणीकरीता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षा शुल्क ना-परतावा राहील.
 5. मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे, कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
 6. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना दिलेले भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईक क्रमांक) व ई-मेल आयडी कृपया भरती प्रक्रिया संपेपर्यंत बदलू नयेत.
 7. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे, जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वत: घ्यावी.
 8. चुकीची / खोटी प्रमाणपत्र सादर करणारा उमेदवार कायदेशीर कारवाईस पात्र राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 9. शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये अर्ज करावयाचे असल्यास तो त्यांच्या कार्यालय प्रमुखाच्या परवानगीने विहीत मार्गाने व विहीत मुदतीत भरणे आवश्यक राहील.
Links For Maharashtra PWD Bharti 2024
Official PDF Notification View
Apply Online               Apply

Leave a Comment