Mahatransco Jalna Bharti 2023. फक्त १० वी पास असाल तर नोकरीची संधी  महापारेषण जालना विभागात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahatransco Jalna Bharti 2023 Details

Mahatransco Jalna Bharti 2023 – नमस्कार मित्रांनो, Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या Mahatransco जालना या विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात २९ नव्या जागा भरणार आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, जालना अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन)” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे. Mahatransco Jalna Bharti 2023 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Mahatransco Jalna Bharti 2023 Notification

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन)
पदसंख्या – 29 जागा
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण – जालना
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

Required Documents for Mahapareshan Jalna Recruitment 2023

 1. आधार कार्ड.
 2. दहावीची सनद.
 3. दहावीची गुणपत्रक.
 4. आय. टी. आय. चे चार सत्राची गुणपत्रके.
 5. मागासवर्गीय असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र.
 6. आर्थिक दृष्टया दुर्बल घटकात मोडत असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र इ.
 7. ऑनलाईन अर्ज केल्याचे Print.
 8. प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र

How To Apply For Mahapareshan Jalna Application 2023

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
 • ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख  19 ऑक्टोबर 2023 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, २२० के. व्ही उपकेंद्र जालना (एमआयडीसी) पिरसर, आशिष पेट्रोल पंपा जवळ, जालना – औरंगाबाद रोड, जालना यासाठी खालील नमुद केलेले दस्ताऐवज आवश्यक असतील.

 1. apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर उमेदवाराची प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणुन नोंद असणे बंधनकारक आहे.
 2. जन्म तारखेसाठी १०वी ची सनद आवश्यक.
 3. इयत्ता दहावीचे गुणपत्रक.
 4. आय. टी. आय. विजतंत्री (Electrician) गुणपत्रक (चारही सत्र / वार्षीक).
 5. आधार कार्ड.
 6. मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र / आर्थिक दुर्बल घटक असल्यास त्याचेही प्रमाणपत्र.
 7. प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamylayer) (लागु असेल तर).
 8. यापूर्वी शिकाऊ उमेदवारी केलेली नसावी.
 9. वरील सर्व कागदपत्रांची स्वसाक्षांकित प्रती.

Procedure and conditions Mahatransco Jalna Bharti

कार्यालयाचे नाव व पत्ता कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, २२० के.व्ही उपकेंद्र जालना (एमआयडीसी) पिरसर, आशिष पेट्रोल पंपा जवळ, जालना औरंगाबाद रोड, जालना पिन.न. ४३१२१३.
मागणी करणारे अधिकारी यांचे पदनाम कार्यकारी अभियंता
निवड पध्दत गुणवत्तेनुसार
भरावयाच्या पदाचे नाव व संख्या वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) पदसंख्या : २९
शिकाऊ उमेदवारीचा प्रशिक्षण कालावधी वीजतंत्री १ वर्ष
विद्या वेतन शासकिय धोरणानुसार
शैक्षणिक अर्हता इ. १० वी उत्तीर्ण आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन. सी. टी. व्ही. टी. नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन आय. टी. आय. दोन वर्ष वीजतंत्री (Electrician) परीक्षा उत्तार्ण असणे आवश्यक.
राखीव पदे कंपनीच्या धोरणानुसार
भरती प्रक्रिया पुढील प्रमाणे राबविण्यात येईल १. जे उमेदवार www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करतील व त्या अर्जाची Screen shot सहीत यासोबत जोडलेला फॉर्म भरून सर्व आवश्यक कागदपत्रासहीत वरील नमूद कार्यालयाच्या पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा टपालाने आवश्यक दस्तऐवजासह पाठवावे.
२. आय. टी. आय. उत्तीर्ण गुण व एस. एस. सी. उत्तीर्ण गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
३. कंपनीच्या विहीत तरतुदीनुसार आरक्षणानुसार निवड यादी तयार केली जाईल. एखाद्या प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास ते गुणवत्तेनुसार प्रवर्गाचा विचार न करता भरले जाईल.
४. निवड केलेल्या उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडुन वैद्यकिय चाचणी करून घेणे बंधनकारक राहिल.
५. कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय कोणताही उमेदवार शिकाऊ उमेदवारीस पात्र ठरणार नाही.
वयोमर्यादा ९.१०.२०२३ रोजी किमान १८ वर्ष पुर्ण / कमाल ३८ वर्ष (मागासवर्गीय / आर्थिक दुर्बलघटक यांना ५ वर्ष शिथीलक्षम)
उमेदवार यांनी घ्यावयाची काळजी बाबत १. उमेदवाराने आपला प्रोफाईल तपासुन घेण्याची जबाबदारी उमेदवारीची असेल.
२. अर्ज सादर करताना एस. एस. सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व आय.टी. आय विजतंत्री उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नाव व आधारकार्डवर नमुद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करून माहिती भरावी.
३. एस. एस. सी. गुणपत्रक / प्रमाणपत्र, आय. टी. आय. उत्तीर्ण सर्व सत्रांचे गुणपत्रक / प्रमाणपत्र (चारही सेमिस्टरची) स्वसांक्षाकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज केला असेल तर मागासवर्ग जात प्रमाणपत्र तसेच
आर्थिक दुर्बल घटक (EWS) मधुन अर्ज केला तर (EWS) प्रमाणपत्र www.apprenticeshipindia.gov.in वर अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच सोबत जोडलेला विहित फॉर्म | screenshot आवश्यक दस्ताऐवज अर्जा सोबत सादर करणे बंधनकारक आहे.
४. शिकाऊ उमेदवारांची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, एस. एस. सी मार्क, आय. टी. आय. मार्क, ही माहिती अचुक भरण्यात यावी. सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
५. शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिका-याकडुन दबाव आणल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करणेत येईल याची नोंद घ्यावी.
६. शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर फोटो, मुळ प्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन करून योग्य रितीने ऑनलाईन माहिती भरावी ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जाची स्किनशॉट सहीत सोबत जोडलेला फॉर्म सुवाच्य अक्षरात बिनचूक भरून विहीत कालमर्यादेमध्ये कार्यालयास प्राप्त होतील अशा बेताने प्रत्यक्ष अथवा टपालाने संपुर्ण दस्तऐवजसह पाठवावे.
७. प्रत्येक उमेदवाराची वर्तणुक चांगली व शिस्तप्रिय असणे आवश्यक आहे. या बाबत कोणतीही गैरवर्तणुक केल्यास शिकाऊ कायदा १९६१ मधील १७ अन्वये शिक्षेस ते पात्र ठरतील.
८. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर ३०० मार्कची (६ तास अवधीची) परिक्षा उमेदवाराने देणे अनिवार्य राहील. जो उमेदवार प्रशिक्षण कालावधी पुर्ण करेल तोच उमेदवार परीक्षेस बसण्यास पात्र असेल.
Important Links For mahatransco.in
📑 PDF जाहिरात https://bit.ly/MahapareshanJalnaBharti2023
👉 ऑनलाईन अर्ज करा https://www.apprenticeshipindia.gov.in/
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahatransco.in/

Leave a Comment