Arogya Vibhag Mumbai Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Arogya Vibhag Mumbai Bharti 2023 Details

Arogya Vibhag Mumbai Bharti 2023 – नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal महानौकरी पोर्टल मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही महाराष्ट्र शासन्याच्या मुंबई आरोग्य विभागात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात २४७५ नव्या जागा भरणार आहेत. मुंबई आरोग्य विभागाच्या २४७५ पदांसाठीच्या भरती गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये होणार आहे.  गट ‘क’ मध्ये अंतर्गत परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे ही पदे येतील. व गट ‘ड’ मध्ये संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवकची पदे उपलब्ध आहेत. अर्ज २९ ऑगस्ट २०२३ पासून उपलब्ध आहे, तसेच अंतिम दिनांक १८ सप्टेंबर २०२३ आहे.

Arogya Vibhag Mumbai Bharti 2023 Notification

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ.
 • पदसंख्या – २४७५  – (८०४ + १६७१) पदे
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –१८ सप्टेंबर २०२३
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
 • मुंबई मंडळ, ठाणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील  उपलब्ध पदसंख्या खालील प्रमाणे आहे

Arogya Vibhag Mumbai vacancy 2023

अ क पदाचे नाव पदसंख्या
1 वाहन चालक 28 जागा
2  नेत्रचिकितस्क 212 जागा
3  गृहपाल 3 जागा
4  प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 10 जागा
5  प्रयोगशाळा सहाय्यक 4 जागा
6 क्ष किरण  वैज्ञानिक अधिकारी 6 जागा
7  रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 4 जागा
8 इसीजी  तंत्रज्ञ 1 जागा
9  औषध निर्माण अधिकारी 25 जागा
10  आहार तज्ञ 2 जागा
11  दूरध्वनीचालक 3 जागा
12   शिंपी 3 जागा
13 नळ कारागीर 3 जागा
14  सुतार 2 जागा
15 वॉर्डन 2 जागा
16 अधिकारीपरिचारिका 300 जागा
17 दंत आरोग्यक 2 जागा
18  अभिलेखापाल 1 जागा
19  लघु टंकलेखक 2 जागा
20  वस्त्रपाल 2 जागा
21 इ इ  जी तंत्रज्ञ 1 जागा
22  गृह वस्त्रपाल 1 जागा
23  आरोग्य निरीक्षक 24 जागा
24  बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 163 जागा
  एकूण  804 जागा

Important Links Mumbai Aarogya Vibhag Bharti 2023
📑 PDF जाहिरात https://bit.ly/48b6y6q
📑 ऑनलाईन अर्ज लिंक https://cdn.digialm.com/
📑 सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती सर्व जाहिराती पहा.
अधिकृत वेबसाईट http://arogya.maharashtra.gov.in
National Mental Health Program Details

माणसाला जसे शारिरीक विकार होत असतात त्याचप्रमाणे मानसिक व्याधी सुध्दा होत असतात. तथापि शारिरीक विकार दृश्य स्वरुपात असतात. परंतु मानसिक विकार वैयक्तिक असल्यामुळे तात्काळ दिसून येत नाहीत. जागतिक पातळीवर समाजात शंभरात एकजण तरी कोणत्या ना कोणत्यातरी गंभीर आजाराने बाधीत असतो व सुमारे 10 ते 12 टक्के माणसं कमी तिव्रतेच्या मानसिक आजारांनी पछाडलेली असतात. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येचा जर विचार केला तर सुमारे 8 ते 10 लाख मानसिक आजाराने त्रस्त आहेत.म्हणजेच राज्यात मानसिक आरोग्य समस्या निर्माण झाली आहे असे म्हणणे वावगे ठरु नये. मानसिक आजाराच्या समस्यांचे गांभिर्य आणि व्याप्ती विचारात घेता केंद्र शासनाने ऑगस्ट 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरु केला. सदर कार्यक्रम अंमलबजावणी महाराष्ट्रात सुध्दा चालू आहे जेणे करुन सामान्य माणूस व ग्रामीण जनता यांना त्याचा लाभ व्हावा. सदर कार्यक्रमासाठी राज्याच्या आरोग्य संचालनालयात विशेष मानसिक आरोग्यकक्ष स्थापन करण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे नोडल ऑफीसर म्हणून अतिरिक्त मुख्य संचालक हे आहेत.

National Mental Health Program Objects 
 1. राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण जनतेसाठी मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे.
 2. आरोग्य सेवेतील उचित अधिका-यांना कार्यक्षम अंमलबजावणीसाठी विविध कार्य आणि जबाबदा-या निश्चित करणे.
 3. मानसिक आरोग्य सेवा या सामान्यतः आरोग्य सेवा सुविधांचा अविभाज्य भाग मानुन सदर कार्यक्रम पूर्तता करणे.
 4. विविध सामाजिक विकास कार्यक्रमामध्ये मानसिक आरोग्य जागृकता व सोयी सुविधा यांची माहिती देणे.
 5. मानसिक आरोग्य सेवा विकास व अंमलबजावणी यामध्ये जनतेला समाविष्ट करुन घेणे.

Leave a Comment