Maharashtra Nagar parishad Requirement 2024 | नगर परिषद मध्ये १७८२ पदांची जाहिरात प्रसिद्ध

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2024 Details

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2024नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal  मध्ये तुमचे स्वागत. आमच्या टीमने आरटीआयमध्ये माहिती घेतली. आरटीआय मध्ये मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदांमध्ये १ जानेवारी २०२४ या तारखेपर्यंत केवळ ४६ टक्के पदे भरलेली आहेत. तर, ५४ टक्के म्हणजेच ३१०६ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर २०२३ मध्ये परीक्षा घेतली होती. १७८२ पदांच्या भरतीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये परीक्षा घेतली, मात्र त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. ही १७८२ पदे भरल्यानंतरही तब्बल १३२४ पदे रिक्तच राहणार आहेत. Maharashtra Nagar parishad Requirement 2024 येणाऱ्या नवीन भरती संधर्भात माहितीसाठी आमच्या What’s App ग्रुप ला जॉईन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Maharashtra Nagar Parishad Requirement 2023 Details

महाराष्ट्र नगर परिषदेने नुकतीच 2023 सालासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र नगर परिषद/ नगर परिषद / नगर पंचायतीमध्ये सामील होण्याची आणि राज्याच्या विकासात आणि कल्याणासाठी योगदान देण्याची ही तुम्हाला संधी आहे. हि भरती तीन गटांमध्ये होणार आहे. त्या गटांची नवे गट A, गट B, आणि C असे आहे. गट A, गट B, आणि C या तीन गटांमध्ये विविध पदांवर रिक्त जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांनी हे लक्ष्यात घेऊन भरती साठी अर्ज भरावा. तसेच भरती संदर्भातील इतर माहिती खाली दिलेल्या pdf मध्ये आहे ती पाहावी हि विनंती.

Maharashtra Nagar Parishad 2023 Vacancies and Departments

  1. स्वच्छता निरीक्षक सेवा
  2. अग्निशमन विभागातील पदे
  3. महाराष्ट्र नगर परिषद कर आणि प्रशासकीय विभागाची भूमिका
  4. महाराष्ट्र नगर परिषद ऑडिट आणि ऑडिट सेवा पदे
  5. महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा विभाग
  6. महा नगर परिषद अभियांत्रिकी सेवा

Maharashtra Nagar Parishad 2023 Application Process

तुम्हाला यापैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यात स्वारस्य असल्यास, अर्जाची प्रक्रिया 13 जुलै 2023 रोजी सुरू होईल आणि 20 ऑगस्ट 2023 रोजी संपेल. पात्रता निकष, अर्ज फॉर्म आणि इतर संबंधित तपशीलांबद्दल तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी, कृपया येथे भेट द्या महाराष्ट्र नगर परिषदेची अधिकृत वेबसाइट: https://mahadma.maharashtra.gov.in/

Maharashtra Nagar Parishad 2023 Group C

ह्या परीक्षेत एकूण १७८२ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि छोट्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केली जाईल. या परीक्षेत विविध विभागांमध्ये नगरपरिषदांसाठी रिक्त जागा आहेत. या सर्वांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

Official Website MahaDMA Maharashtra gov in
Full Notification View Pdf
Online Application Apply here
General provisions regarding number of posts and reservation
  • नमूद करण्यात आलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवानिहाय संवर्गातील किंवा श्रेणीतील भरती करावयाच्या एकूण पदांची संख्या किंवा त्यापैकी आरक्षणाच्या कोणत्याही प्रवर्गाच्या संख्येत बदल (वाढ/घट) होऊ शकतो.
  • पदसंख्या व आरक्षणात बदल झाल्यास त्याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) या संवर्गातील नियुक्त्या ह्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांचेकडील प्रलंबित न्यायालयीन मुळ अर्ज क्र. ९०९/२०२१ व मुळ अर्ज क्र. १४१/२०२२ यांच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून करण्यात येतील.
  • विविध मागास प्रवर्ग, महिला, प्राविण्य प्राप्त खेळाडू, अनाथ इ. साठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. केवळ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद विविध संवर्गाकरीता परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारीत / अतिरिक्त पदांना मंजूरी प्राप्त झाल्यास सदरील पदे भरतीसाठी विचारात घेण्यात येतील.
  • शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांक महिआ २०२३/प्र.क्र.१२३/कार्या-२, दि. ०४ मे, २०२३ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार अराखीव महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
  • अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलाकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतूदी लागू राहतील.
  • उपरोक्त चे अधीन राहून महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच अ.जा. व अ.ज. वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन- क्रीमीलेअरमध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.

Leave a Comment