NHM Solapur Bharti 2023 । राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापुर अंतर्गत 55 रिक्त पदांकरिता नवीन भरती. Government of Maharashtra.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Solapur Bharti 2023 details

NHM Solapur Bharti 2023– राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर येथे “वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, MPW, कीटकशास्त्र, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब तंत्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि डेटा एंट्री ऑपरेटर” या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. 55 जागा भरायच्या आहेत, इच्छुकांनी शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज भरावा. भरतीची तारीख 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत आहे आणि तुम्ही तुमचा अर्ज अधिकृत वेबसाइटवर भरू शकता. अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF पहा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा व pdf डाउनलोड करा. व आमच्या संकेतस्थळाला mahanaukriportal भेट द्या

NHM Solapur Bharti 2023 Notification

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, एमपीडब्ल्यू, कीटकशास्त्र, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब तंत्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर
  • पद संख्या – 55 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • अर्ज शुल्क – अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु.१५०
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना – रु. १००
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता – सोलापुर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक करा. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 Oct 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 Nov 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अधिकृत वेबसाईट – zpsolapur.gov.in

How To Apply for NHM Solapur Bharti 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.

NHM Solapur Bharti 2023 Terms and Conditions

  1. वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन, त्यांचा कालावधी हा दि. ३१/०३/२०२४ पर्यन्तचा राहील. तसेच आधी सदरील पद भविष्यात सन २०२३ – २४ मध्ये नामंजूर / रद्द झाल्यास किंवा सन २०२४-२५ करीता सदरील पदांना मंजूरी प्राप्त राहिल्यास वरील सर्व पदांची सेवा दिनांक ३१/०३/२०२४ रोजी आपोआप संपुष्टात येईल. पंरतू वरील पदे सन २०२४-२५ करीता मंजूर झाल्यास पुढील ११ महिण्याकरीता पुनर्नियुक्ती समाधानकारक कार्यकालानंतर देण्यात येईल.
  2. उमेदवारांकडून दिनांक ३०/१०/२०२३ ते दिनांक ०७/११/२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० या वेळेतच अर्ज स्विकृती करण्यात येईल. अर्ज स्विकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर या ठिकाणी करण्यात येईल. उमेदवारांस एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर करायचा असल्यास, प्रत्येक पदाकरीता स्वंतत्रपणे अर्ज सादर करावा. पंरतू वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत/परिक्षा / परिक्षा घेतली गेल्यास कोणत्या तरी एका पदाकरीता उपस्थित रहावे लागेल. ज्यास उपस्थित राहील त्या पदाकरीता संबधित उमेदवार ग्राहय धरुन, दुसऱ्या पदाकरीता गैरहजर ग्राहय धरण्यात येईल.
  3. पदभरती प्रक्रियेकरीता प्रत्येक अर्जाकरीता अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु. १५०/- (अक्षरी रक्कम रु. एकशे पन्नास फक्त) व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु.१००/- (अक्षरी रक्कम रु. शंभर रुपये फक्त) इतके शुल्क आकारण्यात येत असुन, सदरील शुल्क हे डिमांड ड्राफट (Demand Draft) स्वरुपात स्विकारण्यात येईल. सदरील शुल्क हे नापरतावा (Non Refundable) असुन, उमेदवारांनी डिमांड ड्राफट हे District Integrated Health & Family Welfare Society, Solapur या संपूर्ण नावे असावा आणि अर्जावर एकदम वरच्या बाजुस जोडण्यात यावा. डिमांड ड्राफटच्या मागील बाजुस उमेदवारांने त्यांचे संपूर्ण नाव, अर्ज सादर केलेल्या पदांचे नाव, पद क्रमांक टाकावा. जर डिमांड ड्राफटच्या नावामध्ये चुक आढळल्यास अथवा खराब असल्यास संबधित उमेदवाराचा अर्ज पदभरतीच्या पुढील संपूर्ण प्रक्रियेकरीता ग्राहय धरला जाणार नाही व तसेच उमेदवारांस कोणत्याही टप्प्यावर नव्याने डिमांड ड्राफट मुभा देण्यात येणार नाही, यांची उमेदवारांनी जाणीवपुर्वक नोंद घेण्यात यावी.
  4. वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनावरील असल्याने, सदर पदाकरीता शासकिय सेवेनुसार असलेले नियम, अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही. त्याचसोबत यावरील सर्व पदाकरीता शासनाकडील सेवा नियम लागू होत नाहीत.
  5. सदर रिक्त पदांची संख्या, शैक्षणिक अर्हता, मानधन, वयोमर्यादा, सामाजिक आरक्षण, नियुक्ती ठिकाणामध्ये बदल, नमुद केलेल्या अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असुन पदभरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर यांनी राखुन ठेवलेले आहेत.
  6. सदर रिक्त पदांसाठी आवश्यक पात्रता असलेला अर्ज न मिळाल्यास किंवा आवश्यक त्या संख्येत अर्जदार न मिळाल्यास त्या पदाकरीता असलेले पात्रता आवश्यक्तेनुसार शिथील करण्यात येईल.
  7. तसेच आवश्यक त्या संख्येमध्ये राखीव प्रवर्गाचे उमेदवार आवश्यक प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्या सदर रिक्त पदांच्या पदभरतीची आवश्यक्ता लक्षात घेता अराखीव प्रवर्गातील प्रतिक्षाधीन उमेदवारास राखीव प्रवर्गाकरीता तात्पुरत्या स्वरुपामध्ये
    नियुक्ती देण्यात येईल. (सदरची अट ही ज्या पदाकरीता खुला प्रवर्गाच्या जागा आहेत तिथेच लागू राहिल)
  8. राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील सर्व स्तरावरील पदे ही निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असल्याने, सद्यस्थितीत बदली बाबत कोणतेही धोरण नसल्याने उमेदवारांस नियुक्ती दिल्यानंतर पदस्थापनेत बदल करुन दिला जाणार नाही यांचे उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  9. राखीव प्रवर्गातुन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. अन्यथा अर्ज अप ठरविण्यात येतील. कंत्राटी स्वरुपाची पदे असल्याने जात वैधता प्रमाणपत्रांची (Cast Validity) आवश्यकता नाही. तरी उमेदवारांनी अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
  10. ठराविक प्रमाणपत्र सादरीकरण करणेकामी सेतु कार्यालयाकडील पावती अर्जासोबत सादर केलेली असल्यास, सदरील उमेदवारांचे अर्ज तात्पुरत्या पात्र/अपात्र यादीमध्ये अपात्र ठरविण्यात येतील. पंरतू उमेदवारांनी हरकती वेळेस सदरील सेतु कार्यालयाकडील प्रमाणपत्र सादर केल्यास संबधित उमेदवारांचे अर्ज अंतिम पात्र / अपात्र यादी मध्ये पात्र ठरविण्यात येतील यांची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी.
  11. वैदयकिय परिषदेकडील नोंदणीबाबत अथवा इतर कोणतेही कागदपत्रांची असलेली वैद्यता ही चालू कालावधीतील असावी. तथापि वैद्य प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच परिषदेकडील नोंदणी करणेकामी फी भरलेली पावती, नोंदणी करीता सादर केलेला अर्जांची प्रत अर्जासोबत जोडल्यास ती ग्राहय धरली जाणार नाही. संबधित उमेदवाराकडे नोंदणीचे प्रमाणपत्र व वैद्य असलेले प्रमाणपत्र असणे अपेक्षित आहे.
Important Links For zpsolpaur.gov.in Recruitment 2023
PDF जाहिरात      https://bit.ly/3QAN9EY
अधिकृत वेबसाईट  zpsolapur.gov.in

1 thought on “NHM Solapur Bharti 2023 । राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापुर अंतर्गत 55 रिक्त पदांकरिता नवीन भरती. Government of Maharashtra.”

Leave a Comment